चंद्रपूर – एकच दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा उरला

प्रातिनिधिक फोटो

चंद्रपूर जिल्ह्यात वेगवान झालेल्या कोरोना लसीकरण अभियानाला पुन्हा एकदा धक्कादायक ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात लसींचा फक्त एक दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे . जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असलेला लसींचा साठा संपुष्टात आलाय. जिल्ह्यात तालुकास्थानी आधीच पोचता केलेला आरोग्य केंद्रांवरील 4 हजार कोरोना लसींचा साठा दिवसभरात संपणार आहे. प्रशासनाने मागणी केलेला साठा जिल्ह्यात न पोचल्यास लसीकरण केंद्रे बंद करावी लागणार आहेत.

अॅपवर नोंदणी झालेल्या व 45 वर्षांवरील व्यक्ती अशा एकूण 15 लाखाहून अधिक नागरिकांना जिल्ह्यात लसीकरण अपेक्षित आहे. कोविड योद्धा, कोमॉरबीड रुग्ण आदींच्या लसीकरणासाठी जिल्ह्यात 30 केंद्रे उघडण्यात आली होती. मात्र त्यात भर घालून 45 वर्षे वयावरील व्यक्तींना सुविधा देण्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या 96 करण्यात आली. आता त्या अनुरूप लसींचा साठा देखील उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र 1 लाख 30 हजार लसींचा साठा नोंदवूनही आवक नसल्याने अभियान ठप्प होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या महानगर पालिका हद्दीतील सहा केंद्र बंद करण्यात आले असून, काही तालुक्यात देखील केंद्र बंद होण्याच्या देखील मार्गावर आहेत.आणि याला लसीकरण केंद्र अधिकारी डॉ. संदीप गेडाम,यांनी दुजोरा देखील दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या