
चंद्रपुरात पहाटेच्या सुमारास वाघोबाचे दर्शन झाले आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या नागपूर मार्गावरील प्रवेशद्वारावर वाघाचा मुक्त संचार बघायला मिळाला आहे. या भागात कार्यरत कामगारांना वाघाचे दर्शन झाले. या प्रवेशद्वारातून थेट वसाहत आणि कोळसा हाताळणी यंत्राकडे मार्ग जातो. वीज केंद्राच्या परिसरात वाघासह अन्य वन्यजीव कामगारांसाठी धोकादायक ठरत आहेत. या समस्येवर वनविभाग आणि वीज केंद्र व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
View this post on Instagram

































































