घाटकोपरमध्ये खासगी चार्टर विमान कोसळलं, पाच ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील घाटकोपरच्या पश्चिम भागात गुरुवारी एक खासगी चार्टर विमान कोसळले. या विमानाचे काही तुकडे परिसरात पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे विमान यूपी सरकारने विकले असून या घटनेत विमानातील चौघे आणि एक वाटसरू अशा पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.  अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी अपघातानंतर लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

घाटकोपरच्या सर्वादय रुग्णालय परिसरातील जीवदया लेनमध्ये दुपारी १च्या सुमारास मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. थोड्याच वेळात एक विमान निर्माणाधीन इमारतीवर कोसळल्याचं लक्षात आलं. त्यानंतर हे विमान किंग एअर सी-९० प्रकारातील असून उत्तर प्रदेश सरकारनं हे विमान २०१४ साली विकल्याचं स्पष्ट झालं आहे. विमान अपघाताची माहिती परिसरातील लोकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला कळवली. जागृती बिल्डिंगच्या जवळच एका निर्माणाधीन इमारतीवर हे विमान कोसळलं आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जवान विमान अपघातानंतर लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं

  • मुख्य वैमानिक- मारिया कुबेर
  • सह-वैमानिक- प्रदीप राजपूत
  • तंत्रज्ञ- मनिष पांडे
  • तंत्रज्ञ- सुरभी
  • वाटसरू- गोविंद पंडित

अपघातातील जखमींची नावं

  • लवकूश कुमार
  • नरेश कुमार

पाहा व्हिडीओ: