
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंडित जवाहरलाल नेहरूंमुळे चहावाला पंतप्रधान झाल्याचे सांगणाऱ्या काँग्रेसने गांधी घराण्याबाहेरचा एकतरी अध्यक्ष करून दाखवावाच, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेसला दिले होते. त्यावर काँग्रेसने पलटवार केला आहे. पक्षाने आतापर्यंत नेहरू- गांधी घराण्याबाहेरचे 15 अध्यक्ष दिले आहेत, असे उत्तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिले आहे. चिदंबरम यांनी या अध्यक्षांची नावेच ट्विट केली आहेत.
To jog PM Modi’s memory: among the Congress Presidents since 1947 were Acharya Kripalani,Pattabhi Sitaramayya,Purushottamdas Tandon,U N Dhebar,Sanjiva Reddy,Sanjivaiah,
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) November 17, 2018
चिदंबरम यांनी एकापाठोपाठ एक असे तीन ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी राफेल डील, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर उत्तर देण्याचे आव्हान मोदी यांना दिले आहे. ‘मोदींना माहीत असावे म्हणून गांधी घराण्याशी संबंधित नसलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षांची नावे देत आहे. 1947 नंतर आचार्य कृपलानी, पट्टाभी सीतारमैय्या, पुरुषोत्तमदास टंडन, यू. एन. धेबर, संजीव रेड्डी, संजीवैय्या, कामराज, निजलिंगप्पा, सी. सुब्रमण्यम, जगजीवन राम, शंकरदयाळ शर्मा, डी. के. बरुआ, ब्रम्हानंद रेड्डी, पी. व्ही. नरसिंहराव आणि सीताराम केसरी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत,’ असे सांगतानाच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लाल बहादूर शास्त्री, के. कामराज आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या आणि देशासाठी मोठे योगदान देणाऱ्या नेत्यांचाही आम्हाला अभिमान आहे,’ असे वक्तव्य चिदंबरम यांनी केले आहे.
Kamaraj,Nijalingappa,C Subramanian,Jagjivan Ram,Shankar Dayal Sharma,D K Barooah,Brahmananda Reddy,P V Narasimha Rao and Sitaram Kesri
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) November 17, 2018
‘काँग्रेसच्या अध्यक्षपदी कुणाला नियुक्त करण्यात आले याची चिंता व्यक्त केल्याबद्दल मोदींचे आभार.यावरून पंतप्रधान मोदींकडे या विषयावर चर्चा करण्यासाठी बराच वेळ असल्याचे दिसून येते असेही पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारने सीबीआयला ‘प्रायव्हेट आर्मी’ बनवले – काँग्रेस
आंध्र प्रदेश सरकारने सीबीआय संदर्भात जारी केलेला आदेश गंभीर असून मोदी सरकारने देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा सीबीआयला ‘प्रायव्हेट आर्मी’ बनवल्याची गंभीर आरोप काँग्रेस नेते पवन खेडा यांनी केला आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने सीबीआयला राज्यात छापेमारीसाठी तसेच तपासासाठी देण्यात आलेली सामान्य परवानगी शुक्रवारी मागे घेतली. गेल्या साडेचार वर्षांत देशातील संस्थांची आपण काय परिस्थिती करुन ठेवली आहे, याचा मोदी सरकारने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. जर यात सुधारणा झाली नाही, तर देशासाठी हा मोठा धोका असल्याचेही खेडा म्हणाले.




























































