
मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील करुआ गावातील विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करत शाळेत जावे लागत आहेत. गावातील बेतवा नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या खांबांवरून उड्या मारत विद्यार्थी ही नदी पार करत आहेत. 8 किलोमीटरचा लांबचा वळसा वाचवण्यासाठी हे विद्यार्थी रोज असा धोकादायक मार्ग निवडत आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील करुआ गावातील विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करत शाळेत जावे लागत आहेत. गावातील बेतवा नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या खांबांवरून उड्या मारत विद्यार्थी ही नदी पार करत आहेत. pic.twitter.com/VxlTLxRWCN
— Saamana Online (@SaamanaOnline) August 4, 2026
व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले आहे. नदीपलीकडच्या करुआ गावातील हे विद्यार्थी असून ते पलोह येथील हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी जातात. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अधिकृत रस्त्याने गेल्यास विद्यार्थ्यांना ८ ते १० किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागतो, म्हणूनच ते रोज या स्टॉप डॅमवरून जीवघेणा प्रवास करतात.
विदिशाचे उपविभागीय अधिकारी (SDM) क्षितिज शर्मा यांनी या घटनेची दखल घेतली आहे. सुरक्षित पण लांबच्या मार्गाने प्रवास करता यावा, यासाठी बाधित विद्यार्थ्यांना प्रशासनातर्फे सायकली दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. नदीवर एक तात्पुरता (हंगामी) पूल उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.





























































