
अकरावी प्रवेशाच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या असून आतापर्यंत अकरावीला 10 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. शिक्षण संचालनालयाने अकरावीचे वर्ग 15 जुलैपासून जाहीर करण्याच्या सूचना सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत.
विशेष फेरीअंतर्गत 3 लाख 92 हजार 693 विद्यार्थ्यांना जागा वाटप झाले होते. त्यातील 3 लाख 24 हजार 102 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. यामध्ये नियमित फेरीअंतर्गत 3 लाख 12 हजार 983 तर कोटय़ांर्गत 11 हजार 119 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिक्षण संचालनालयाने अकरावीचे वर्ग 15 जुलैपासून जाहीर करण्याच्या सूचना सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत. महाविद्यालये सुरू होईपर्यंत अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष फेरीही पार पडणार आहे.
10 जुलैपासून मुलींसाठी विशेष फेरी
10 जुलैपासून दुसरी विशेष फेरी सुरू होणार आहे. ही फेरी खास मुलींसाठी असेल. या फेरीचे शिक्षण संचालनालयाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 10 ते 11 जुलै रोजी या फेरीसाठी नोंदणी, भाग 1 दुरुस्ती, पसंतीक्रमांक भरता येणार आहे. 13 जुलैला सकाळी 10 वाजता जागा वाटप करण्यात येईल. 10 जुलैला सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जावून प्रवेश घ्यावा लागेल.


























































