पुन्हा आंदोलनाची वेळ आणू नका! ‘कॉक्रोच’चा मोदी सरकारला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘सरकारने शब्द दिल्याप्रमाणे जेन-झी आंदोलकांवरील गुन्हे मागे न घेतल्यास आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागेल. तसे करायला आम्हाला भाग पाडू नका. अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा,’ असा इशारा कॉक्रोच पार्टीने मोदी सरकारला दिला.

दिलेल्या आश्वासनानुसार सरकारने विद्यार्थ्यांवरील गुन्हे अद्याप मागे घेतले नाहीत. यासंदर्भात सीजेपीचे आशुतोष रांका यांनी एक ‘एक्स’ पोस्टद्वारे सरकारला आठवण करून दिली आहे. दरम्यान, सीजेपीने आंदोलनाचा इशारा देताच आंदोलनातील सर्व विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे व अटक केलेल्यांना सोडून देण्याची घोषणा बिहार सरकारने केली आहे.