
न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवरील अत्याचारावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा मोदी सरकारवर हल्ला चढवला. ‘विद्यार्थ्यांसाठी ही संपूर्ण व्यवस्थाच जीवघेणी झाली आहे,’ असा आरोप राहुल यांनी केला.
राहुल यांनी ‘एक्स’ पोस्ट करत पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची, अटक केलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करण्याची सरकारने दिलेल्या आश्वासनांचे काय झाले,’ असा सवाल राहुल यांनी मोदींना केला.




























































