कोरोनाची दुसरी लाट ओसरायला किमान 100 दिवस लागणार! तज्ज्ञांनी वर्तवली भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्तानात कोरोना महामारीचा पुन्हा उद्रेक झाला आहे. या महामारीची दुसरी लाट आली असून या लाटेत अनेक जण झपाट्याने संक्रमित होताना दिसत आहेत. ही परिस्थिती केव्हा निवळणार असा प्रश्न पडलेल्यांना तज्ज्ञ मंडळींनी उत्तर दिलं आहे.

Video -पोलिसांना घाण शिव्या देणाऱ्याला केला’सरळ’

दुसरी लाट ओसरायला किमान 100 दिवस लागतील असं तज्ज्ञांचे मत आहे. देशातील 70 टक्के जनतेचे लसीकरण होत नाही आणि समूह रोगप्रतिकारशक्ती निर्माण होत नाही तोपर्यंत कोरोनाच्या लाटांमागून लाटा धडकत राहतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोविडमध्ये ट्रेन बंद होणार नाहीत…! रेल्वे बोर्डाचे स्पष्टीकरण

दिल्ली पोलिसांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला कसा करावा याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मागितले होते. या मार्गदर्शनादरम्यान तज्ज्ञांनी कोरोनाची दुसरी लाट किमान 100 दिवस राहू शकते अशी भीती वर्तवली आहे. लसीकरण मोहीम वेगाने राबवण्यासोबतच हर्ड इम्युनिटी निर्माण होणं हे दुसरी लाट ओसरवण्यासाठी महत्वाचं अस्त्र ठरू शकतं.

एकाच वेळी 112 मृतदेहांवर अंत्यसंस्कार; भोपाळमध्ये स्मशान शांतता

हर्ड इम्युनिटी म्हणजे सामूहीक रोगप्रतिकारशक्ती असं आपण सोप्या शब्दात म्हणू शकतो. यामध्ये एखाद्या रोगाविरोधात बऱ्याच लोकांच्या शरीरात प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते. सामूहीक रोगप्रतिकारशक्तीमुळे त्या रोगाचा परिणाम कमी व्हायला लागतो. कोरोनाविरूद्ध हर्ड इम्युनिटी तयार झाल्यास शरिरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात, ज्यामुळे त्या व्यक्तीला कोरोनाची लागण होत नाही. सामूहीक रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्याने कोरोना फैलावण्याचा वेग मंदावतो. कोरोनाची पहिली लाट कमजोर करण्यात हर्ड इम्युनिटीचा मोठा वाटा होता.

गुजरातमध्ये त्सुनामी; एकाच सरणावर पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार! न्यायालयाने सरकारला फटकारले

दिल्ली पोलिसांना डॉ.नीरज कौशिक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की दुसऱ्या लाटेमध्ये लस घेतलेल्यांनाही कोरोना होत असल्याचे दिसून आले आहे. एक व्यक्ती बाधित झाली तर त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंब बाधित व्हायला लागलं आहे. लहान मुलांनाही म्युटेट झालेल्या कोरोना विषाणूने बाधित करायला सुरुवात केल्याचं कौशिक यांचं म्हणणं आहे. रुप बदललेल्या या विषाणूने ग्रासलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली तरी ते पॉझिटीव्ह असल्याचं कळत नाही. अशी काही उदाहरणे समोर आल्याचं कौशिक यांनी सांगितलं आहे. ही लाट लवकर ओसरावी यासाठी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे याकडे लक्ष द्यावे असे पोलिसांना कौशिक यांनी सांगितले आहे. नवभारत टाईम्सच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.