43 कोटींच्या आलिशान बंगल्यात सुरू होती लग्नाची तयारी…अचानक मालक आला…

अनेकजण वेगळेपणाने लग्न करण्यासाठी विविध कृप्त्या वापरतात. असेच वेगळ्या प्रकारे लग्न करण्याचे प्रयत्न एका जोडप्याच्या अंगलट आले आहे. आलिशान बंगल्यात आणि श्रीमंती थाटात लग्न करण्याची एका जोडप्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी अनेक महिन्यापासून रिकाम्या असलेल्या बंगल्याची निवड केली. हा बंगला सुमारे 43 कोटींचा आहे. हा बंगला रिकामा असल्याने लग्नात काहीच अडसर येणार नाही, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे बंगल्यात लग्नासाठी जय्यत तयारी सुरू होती. त्याचवेळी या बंगल्याचा मालक तेथे आला.

अमेरिकेतील फ्लोरियात राहणाऱ्या या जोडप्याने एका बंगल्यात लग्नाची जय्यत तयारी सुरू केली होती. हा बंगला रिकामा असल्याने काहीच खर्चही येणार नाही आणि कोणाचीही परवानगी न घेता श्रीमंती थाटात आपले लग्न पार पडले असे या जोडप्याला वाटत होते. त्यामुळे बंगल्याचा मालक कोण आहे, याचा विचार न करता, त्याच्या परवानगीशिवायच बंगला आपलाच आहे, या थाटात त्यांची तयारी सुरू होती. शानदार रिसेप्शनसह रेड कारपेट कॉकटेल अवरचीही त्यांची योजना होती.

कर्टनी विल्सन आणि शेनीटा जोन्स यांनी आपल्या या ड्रीम वेडिंगचे निमंत्रण परिवारासह मित्रांनाही दिले होते. मात्र, सगळ्यांसमोर त्यांची फजिती झाली. लग्नाची तयारी सुरू असतानाच बंगल्याचा मालक तिथे आला. त्यावेळी या जोडप्याची तारंबळ उडाली. आपल्या बंगल्यात काय सुरू आहे, हे मालकाला कळलेच नाही. त्याला या ड्रीम वेडिंगबाबत समजल्यावर त्याने पोलिसांना बोलावले.

सुमारे 43 कोटींचा हा बंगला 16 हजार 300 स्क्वेअर फूटांचा आहे. त्यात 15 बाथरून, होम थियेटर, 800 स्क्वेअर फूटांचा बार, टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल आणि इतर अनेक सुविधा आहेत. हा बंगला नेथल फिंकेल यांच्या मालकीचा आहे. या बंगल्यापासून थोडे दूर असलेल्या बंगल्यात ते राहतात.मात्र, बंगल्याचा मालक आसपास राहत असल्याचे जोडप्याला माहिती नव्हते. ते आपल्या ड्रीम वेडिंगच्या स्वप्नात वावरत होते.

पोलिसांनी जोडप्याची चौकशी केली तेव्हा समजले की, विल्सन या बंगला खरेदी करण्याच्या हेतून काही दिवसांपूर्वी आला होता. मात्र, हा बंगला अनेक महिन्यांपासून रिकामा आहे. तसेच याची खरेदी करण्यासाठी कोणी उत्सुक नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने बंगला खरेदी केला नाही. मात्र, हा रिकामा बंगला आपल्याला ड्रीम वेडिंगसाठी वापरता येईल, असा बेत त्याने आखला आणि लग्नाच्या तयारीला सुरुवात केली होती.

बंगल्याचे मालक नेथल यांनी जोडप्याला बंगल्यातून जाण्यास सांगितले. तसेच परवानगीशिवाय अशा गोष्टी करू नका, असा सल्लाही दिला. पोलिसांनीही त्यांची चौकशी करून त्यांना समज देत सोडून दिले. मात्र, या घटनेने या जोडप्याचे ड्रीम वेडिंग होऊ शकले नाही. मात्र, सगळ्यांसमोर झालेल्या फजितीने ही घटना कायम त्यांच्या लक्षात राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या