लस घेतलेल्या व्यक्तिला कोरोनाची लागण, विमान प्रवासात आकस्मिक मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका लसीकरण झालेल्या व्यक्तिला कोरोनाची लागण होऊन तिचा विमान प्रवासात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विमानाच्या सीटवरच त्या व्यक्तिचा मृतदेह आढळला आहे.

हा माणूस 51 वर्षांचा होता. तो तुर्कस्तानच्या इस्तंबूल ते जर्मनीतील हम्बर्ग येथे प्रवास करत होता. हा माणूस मूळ रशियन असून तो जर्मनीचा रहिवासी होता. 25 ऑक्टोबर रोजी इस्तंबूल ते जर्मनी असा प्रवास करणाऱ्या विमानात तो बसला होता.

विमान जेव्हा जर्मनीत उतरलं तेव्हा तो त्याच्या सीटवरच झोपून असल्याचं लक्षात आलं. त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो मृत झाल्याचं विमानातील क्रू सदस्यांना लक्षात आलं.

या प्रवाशाने कोविडच्या दोन्ही लसी घेतल्याचं प्रमाणपत्र सादर केलं होतं. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालात त्याला मृत्युपूर्वी काही दिवस आधी कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं. तो विमान प्रवासादरम्यानच मरण पावला होता.

मात्र, त्याचा मृत्यू नेमका कोविड मुळेच झाला का, हे स्पष्ट होऊ शकलं नाही. त्याला आधीच काही आजार होते. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.