अक्कलकोटमध्ये तलवारी विकणाऱ्यासह दहाजणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील करजगी, जेऊर, पानमंगरूळ व अक्कलकोट येथे 12 तलवारी विकणाऱ्यासह त्या खरेदी करणाऱ्या 10 जणांना अटक करण्यात आली आहे.

तलवारी विकणाऱ्या बमलिंग पंचाक्षरी बमगोंडा (रा. काशीराया काका पाटीलवस्ती, जेऊर, ता. अक्कलकोट) याच्यासह त्या खरेदी करणाऱ्या अनिल मल्लिकार्जुन हेळवे (वय 20), राहुल सिद्राम हेळवे (वय 20, दोघे रा. हेळवेवस्ती, करजगी), रवि सुभाष चव्हाण (वय 23, रा. जोगी गल्ली करजगी), गजप्पा नागप्पा गजा (वय 23, रा. गजाननवस्ती, करजगी), मनपाक शिराज मिरगी (वय 22, रा. मड्डीवस्ती, पानमंगरूळ, ता. अक्कलकोट), नबीलाल अब्दुल रजाक मळी (वय 20, रा. जमादार गल्ली, पानमंगरूळ), गौतम अंबादास बनसोडे (वय 19, रा. भीमनगर बंकलगी, ता. दक्षिण सोलापूर), सुरेश इंडे (वय 20, रा. बुधवार पेठ, अक्कलकोट), शब्बीर हसन नदाफ (रा. बंकलगी, ता. दक्षिण सोलापूर), नागण्णा सुभाष तळवार (रा. पानमंगरूळ, ता. अक्कलकोट) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

आरोपी बमलिंग पंचाक्षरी बमगोंडा याने विक्रीच्या उद्देशाने तलवारीचा साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने येथे सापळा लावून त्याला पकडले असता, तो अवैधपणे तलवारी मागवून त्या विकत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्या माहितीवरून तलवारी विकत घेणाऱ्या 10 जणांनाही अटक केली आहे. आरोपींनी दहशत पसरविण्याच्या उद्देशाने 26 हजार रुपये किमतीच्या लोखंडी पात्याच्या निरनिराळ्या आकाराच्या, पितळी व स्टील धातूच्या मुठी असलेल्या तलवारी विकत घेतल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेबल विजयकुमार भरले यांनी फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक काकडे तपास करीत आहेत.