अजेय क्रोएशिया डेन्मार्कला भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,नोवगोरॉड

फिफा वर्ल्ड कपच्या गटफेरीत तीनही लढती जिंकून अजेय राहिलेला क्रोएशियाचा संघ आज बाद फेरीत डेन्मार्कला भिडणार आहे. आता एक चूकही किती महागात पडू शकते याची जाणीव असल्याने उभय संघ नक्कीच मोठय़ा तयारीनिशी मैदानावर उतरतील.

दृष्टिक्षेपात…

  • क्रोएशिया-डेन्मार्क आतापर्यंत ६ वेळा एकमेकांना भिडले असून, उभय संघांनी २-२ लढती जिंकल्या, तर २ सामने ड्रॉ झाले आहेत.
  • १९९८नंतर दुसऱ्यादा क्रोएशियाने गाठली बाद फेरी.
  •  क्रोएशियाने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये केलेल्या ७ पैकी ६ गोल मध्यंतरानंतर केले आहेत.

आजच्या लढती
स्पेन वि. रशिया, मॉस्को (रात्री ७.३०वा.)
क्रोएशिया वि. डेन्मार्क, नोवगोरॉड (रात्री ११.३० वा.)