
सामना ऑनलाईन, निझनी नोवोगोरोड
फिफा वर्ल्ड कपमधील रविवारचा दिवस फुटबॉलशौकिनांसाठी संस्मरणीय ठरला. यजमान रशियाने स्पेनचा शूटआऊटमध्ये पराभव करून ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर मध्यरात्री क्रोएशिया व डेन्मार्क यांच्यातील लढतही शूटआऊटपर्यंत ताणली. क्रोएशियाने यात ३-२ गोल फरकाने बाजी मारून वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. क्रोएशियाचा गोलरक्षक डॅनिजेल सुबासिच हा या थरारक विजयाचा शिल्पकार ठरला. आता क्रोएशिया आणि यजमान रशिया एकमेकांना भिडणार आहेत.
फिफा वर्ल्ड कपच्या गटफेरीतील तीनही सामने जिंकून बाद फेरी गाठल्याने क्रोएशियाचे पारडे जड होते. दुसरीकडे १९९८ नंतर पुन्हा एकदा बाद फेरीचा अडथळा ओलांडण्यास डेन्मार्कचा संघ उत्सुक होता. डेन्मार्कने पहिला मिनिट पूर्ण होण्याच्या आतच गोल मारून १- ० अशी आघाडी मिळकली. मॅथियस जोर्गनसनने हा गोल केला, मात्र त्यांचा हा आनंद औटघटकेचा ठरला. कारण मारियो मेंडझुकिझने चौथ्याच मिनिटाला गोल मारून क्रोएशियाला १-१ अशी बरोबरी मिळकून दिली. यानंतर दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. डेन्मार्कला आणखी एक गोल मारण्याची संधी मिळाली खरी पण क्रोएशियाच्या गोलकीपरने हा प्रयत्न हाणून पाडला. मध्यांतरानंतर डेन्मार्कच्या खेळाडूने उल्लेखनीय खेळ करताना क्रोएशियाचे जबरदस्त आक्रमण अचूकपणे थोपकले. क्रोएशियाचे ६ ऑनटार्गेट प्रयत्न डेन्मार्कच्या गोलरक्षकाने निष्फळ ठरकले. अर्जेंटिनाकिरुद्ध चमकलेले क्रोएशियाचे लुका मॉड्रीच आणि इक्हान रॅकिटीच यांना जखडून ठेकण्यात डेन्मार्कने यश मिळकले. निर्धारित केळेत १- १ अशी बरोबरी कायम होती. त्यानंतर अतिरिक्त केळेतही बरोबरीची कोंडी फुटू न शकल्याने हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये पोहचला. १२० मिनिटांच्या खेळात डेन्मार्कने क्रोएशियाला १-१ असे बरोबरीत रोखून मानसिक लढाई तर जिंकली होती, मात्र पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने बाजी मारली.
गोलरक्षकांचा पोलादी बचाव
पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाचा गोलरक्षक डॅनिजेल सुबासिच आणि डेन्मार्कचा गोलरक्षक कॅस्पर श्मायकर यांच्या पोलादी बचावातील चुरस बघायला मिळाली. सुबासिचने डेन्मार्कच्या एरिक्सन, डेली आणि यॉर्गनसन यांच्या पेनल्टी थोपवून क्रोएशियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. डेन्मार्कचा गोलरक्षक श्मायकर याला क्रोएशियाच्या बेडल व पिवारिच यांच्याच दोन पेनल्टी अडवता आल्या. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाकडून क्रॅमरिच, मॉडरिच व रॅकिटिच यांनी गोल केले. डेन्मार्ककडून सिमॉन केअर व शोना यांनाच गोल करता आले.





























































