चालत्या वाहनावर झाड पडून झालेला मृत्यू हा वाहन अपघातच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहन चालवताना झाड पडून चालकाचा मृत्यू झाल्यास तो मोटार अपघात म्हणून ग्राह्य धरला जाईल आणि या प्रकरणात विमा कंपनीला नुकसानभरपाई द्यावी लागेल, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती एचपी संदेश यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या आव्हानाला उत्तर देताना हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. कोल्हापूर जिह्यातील सालपेवाडी-गारगोटी रस्त्यावर 2 जूलै 2006 साली 44 वर्षीय शामराव पाटील दुचाकीवरून जात असताना झाडाची फांदी अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. कनिष्ठ न्यायालयाने 2011 साली विमा कंपनीला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला विमा कंपनीने आव्हान दिले होते.