संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रवींद्र सिंहाचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह रवींद्र याचे सोमवारी निधन झाले. तो 17 वर्षांचा होता. गेल्या दोन वर्षांपासून त्याची प्रकृती ठीक नव्हती. त्याच्या शरीरातील अवयव निकामी होऊ लागले होते. त्याला तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. 21 सप्टेंबर 2009 रोजी रवींद्र सिंहाला बनेरगट्टा प्राणिसंग्रहालयातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. त्यावेळी त्याचे वय चार वर्षे होते.