नवीन वर्षात एटीएम सेवा बंद होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

जर वेळ वाचावा म्हणून पैसे काढण्यासाठी तुम्ही बँकेत न जाता एटीएम मधून पैसे काढत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत देशातील 50 टक्के एटीएम बंद होणार आहेत.

एटीएम चालवणाऱ्या दि कॉन्फिडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री (CATMi) ने दिलेल्या माहितीनुसार एटीएम सेवा देणाऱ्या कंपन्या 2019 पर्यंत 1.13 लाख एटीएम बंद करण्याचा विचार करत आहेत. एटीएम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अपग्रेड करण्याबरोबरच सध्या सुरू असलेlल्या चलन तुटवड्यामुळे एटीएम सेवा बंद करण्याचा पर्याय कंपन्यांसाठी अधिक सोयीस्कर आहे. यामुळे पुढील वर्षी नोटबंदीच्या वेळी उद्भवलेल्या परिस्थिती सारखीच निर्माण होण्याची शक्यता या कंपन्यांनी वर्तवली आहे.