
मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले. तसेच काहीसे वक्तव्य महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री असल्याचे म्हणत, एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मानण्यास त्यांनी एक प्रकारे नकारच दिल्याचे बोलले जात आहे.
विखेंना मंगळसूत्र बदलण्याची सवयच
जे मुख्यमंत्री तुम्हाला नको, त्यांच्या हाताखाली तुम्ही का काम करीत आहात? मान्य नसेल तर जबरदस्तीने काम करू नका. याला बलात्कार म्हणतात, असा टोला शिवसेना नेते, संजय राऊत यांनी पाचोरा येथे लगावला. मनात नसताना नांदायचे म्हणतात. म्हणजेच प्रेम एकावर अन् नांदायचे दुसऱयासोबत, हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. ते आधी शिवसेनेत होते, काँग्रेसमध्ये होते आणि आता भाजपमध्ये आहेत. त्या विखेंना मंगळसूत्र बदलण्याची सवयच आहे, असेही संजय राऊत म्हणाले.




























































