दीपक भोगले, भूषण बांदिवडेकर ‘मानपत्र’ने सन्मानित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी दीपक शांताराम भोगले व भूषण प्रभाकर बांदिवडेकर यांना मालवण एज्युकेशन सोसायटीतर्फे स्व. डॉ. एस. के. पंतवालावलकर मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे मानपत्र वितरण सोहळा पार पडला. यावेळी मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंदकुमार चव्हाण, सचिव विजय कामत, पदाधिकारी जी. व्ही. सामंत, दिगंबर सामंत, सुदेश मयेकर, प्रकाश प्रभू, मुख्याध्यापक मिलींद अवसरे, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष डॉ. रामचंद्र चव्हाण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भोगले व बांदिवडेकर यांचा सत्कार केला. प्रास्ताविक विजय कामत यांनी केले.

यावेळी संस्था अध्यक्ष आनंदकुमार चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी आता आयटी, मेडिकल क्षेत्रासोबत क्रियेटीव्ह बनवून अनेक क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण करावे. भविष्यात टोपीवालामध्ये व्यावसाय शिक्षणासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. शेवटी मुख्याध्यापक मिलींद अवसरे यांनी आभार मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जोशी यांनी केले.