
ज्येष्ठ शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल, पद्मश्री ज्ञानदेव यशवंतराव पाटील तथा डॉ. डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी कसबाबावडा येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. बुधवारी त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कोल्हापूरच्या पॅव्हेलियन मैदानात अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने अनेक संस्थांचे आधारवड, शिक्षण आणि समाजकारणातील दीपस्तंभ हरपल्याची भावना सर्वच क्षेत्रातून व्यक्त होत आहे.



























































