एलन मस्क यांचे आव्हान झुकेरबर्गने स्वीकारले; आता रंगणार ‘केज फाइट’

एलन मस्क Vs झुकेरबर्ग. समाज माध्यमातील दोन दिग्गज. ट्विटर आणि फेसबुक .दोन्ही परस्परांना पूरक. तरीही दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी. आता ही व्हर्चुअल स्पर्धा प्रत्यक्ष पिंजऱ्यात होणार आहे. २६ ऑगस्टला ही लढत  होण्याची शक्यता आहे.  याबाबत एलन मस्क म्हणतो, लढत छोटी असेल तर मीच जिंकेन, माझे वजन 136 किलो आहे.  मस्क यांनी झुकेरबर्ग यांना केज फाइटसाठी पहिल्यांदा आमंत्रित केले, तेव्हा झुकेरबर्ग यांनीच ही तारीख सुचवली होती. मस्क यांनी अद्याप लढाईच्या तारखेला दुजोरा दिलेला नाही.

मस्क यांच्या मानेचा आणि पाठीच्या वरच्या भागाचा एमआरआय करायचा आहे. यानंतर शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस ते तारखेची माहिती देतील.  ही लढत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर थेट प्रक्षेपित केली जाईल. यातून मिळणारे उत्पन्न वृद्धांसाठी दान केले जाणार आहे.

झुकेरबर्गच्या  मेटाला  ट्विटरसारखे व्यासपीठ आणायचे आहे.  तेव्हा ट्विटर संपवण्याचा झुकरबर्गचा मास्टर प्लान समोर आला. हे वृत्त ट्विटरवर शेअर केले जाऊ लागले. अशाच एका पोस्टवर एलन मस्क यांनी झुकेरबर्ग यांना चिडवणारा इमोजी पोस्ट केला. याबाबत अधिक तपशील मारिओ नफवाल नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर केले गेले. एलन मस्कही नफवालला फॉलो करतो. मेटाच्या नवीन अॅपला ‘थ्रेड’ असे नाव दिले जाऊ शकते, असे त्यात म्हटले आहे. इथूनच केज फाईट चॅलेंजला सुरुवात झाली. मस्क यांनी पोस्टवर उत्तर दिले, मी केज फाइटसाठी तयार आहे. यानंतर झुकेरबर्ग यांनी मस्क यांना लढाईच्या ठिकाणाबद्दल विचारले, मस्क यांनी उत्तर दिले, वेगास ऑक्टोगन.

मस्क स्ट्रीट फायटर, तर झुकेरबर्ग जू-जित्सू चॅम्पियन

52 वर्षीय मस्क दक्षिण आफ्रिकेत लहानाचे मोठे झाले. मस्क यांनी सांगितले की, त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील वास्तविक हार्ड-कोर स्ट्रीट फाईट्समध्ये भाग घेतला होता. झुकेरबर्ग (39) एक महत्त्वाकांक्षी मस्क स्ट्रीट फायटर आहेत, त्यांनी आधीच जू-जित्सू स्पर्धा जिंकल्या आहेत. अलीकडेच त्यांनी मर्फ चॅलेंज वर्कआउट 40 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण केले होते.

जू-जित्सू आणि केज फाईट म्हणजे काय?

जू-जित्सू हे निशस्त्र लढाईचे  जपानी तंत्र आहे. केज फाइटमध्ये दोन लढवय्ये पिंजऱ्याच्या आत लढतात. लढवय्ये अनेक लढाऊ तंत्रे वापरतात. यामध्ये बॉक्सिंग, कुस्ती, ज्युडो, जू-जित्सू, कराटे, मुय थाई यांसारख्या मिश्र प्रकारच्या मार्शल आर्ट्ससारख्या तंत्रांचा वापर केला जातो