यंदा झोपेचे खोबरे होणार नाही; वर्ल्ड कप अमेरिका-विंडीजमध्ये, पण वेळ हिंदुस्थानची

आगामी टी-20 वर्ल्ड कप अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये असल्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना झोपेचे खोबरे करावे लागणार असे वाटत होते. मात्र आयसीसीने हिंदुस्थानी क्रिकेटची वाढती ताकद पाहता हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना या वेगवान क्रिकेटचा पुरेपूर आनंद उपभोगता यावा म्हणून अनेक महत्त्वाच्या सामन्यांच्या प्रक्षेपणाच्या वेळा हिंदुस्थानी वेळेनुसार ठेवल्यामुळे यंदा कुणालाही झोपेचे खोबरे करावे लागणार नाही. मात्र स्पर्धा अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये असली तरी सामन्यांच्या वेळा हिंदुस्थानला सोयिस्कर असल्यामुळे प्रत्यक्ष मैदानात अत्यल्प गर्दी दिसण्याची दाट शक्यता आहे.

हिंदुस्थानची वेळ अमेरिकेपेक्षा 9.30 तास मागे असल्यामुळे सामन्यांच्या आयोजनाबाबत अनंत अडचणी होत्या. त्यावर आयसीसीने काहीअंशी तोडगा काढताना हिंदुस्थानच्या वेळेला प्राधान्य देताना दिवसातील एक लढत स्थानिक क्रिकेटप्रेमींना सोयिस्कर अशी ठेवली आहे. त्यामुळे दिवसाला दोन किंवा तीन सामने असले तरी एक सामना अमेरिका- विंडीजच्या वेळेनुसार रात्री (हिंदुस्थानच्या स्थानिक वेळेनुसार पहाटे) सुरू होईल तर उर्वरित एक किंवा दोन लढती या हिंदुस्थानी आणि आशियाई प्रेक्षकांना पाहता याव्यात म्हणून रात्री 7.30 ते 10.30 च्या मध्ये सुरू होणार आहेत. त्यामुळे हा पहिलाच वर्ल्ड कप आहे यात हिंदुस्थानसह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तिन्ही क्रिकेटप्रेमी देशांतील क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटचे थेट प्रक्षेपण आपापल्या वेळेनुसार पाहता येईल, अशा वेळांनुसारच सामने सुरू होणार आहेत. त्यामुळे एक सामना पहाटे 5 वाजता सुरू होईल, तर शेवटचा सामना रात्री 10.30 वाजता खेळला जाईल. विशेष म्हणजे टी-20 चे सामने रात्री खेळविले जातात, पण या स्पर्धेत केवळ किंग्जटाऊन आणि नॉर्थ साऊंड शहरातील सामनेच रात्री खेळविले जाणार आहेत. त्यामुळे या लढती हिंदुस्थानी चाहत्यांना पहाटे उठून पाहाव्या लागणार आहेत.

सुपर-8 च्या लढतीही हिंदुस्थानच्या सोयीच्या

यंदाही पाच-पाच संघांचे चार गट पाडण्यात आले असून प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ सुपर एटसाठी पात्र ठरतील. त्यानंतर आठ संघाचे चार-चार असे दोन गट पाडले जातील आणि प्रत्येक संघ गटातील तिन्ही संघांशी प्रत्येकी एक सामना खेळेल. त्यामुळे सुपर-8 मध्ये प्रत्येक गट तीन सामने खेळणार आहे. या लढतीही एक अमेरिकेच्या तर एक हिंदुस्थानच्या वेळेनुसार खेळविली जाणार आहे. सुपर-8 मध्ये हिंदुस्थान गटात पहिला असो किंवा दुसरा, याचा कार्यक्रमावर फारसा फरक पडणार नाही. कारण सुपर-8 च्या दोन लढती प्रत्येक दिवशी खेळविल्या जाणार असून एक लढत पहाटे तर दुसरी रात्री होणार आहे. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला तर तो सामना ब्रिजटाऊन येथेच खेळविला जाणार आहे. त्याचबरोबर अंतिम साम्न्याची वेळही हिंदुस्थानी वेळेनुसारच रात्री 7.30 वाजता ठेवली आहे. म्हणजेच वर्ल्ड कप अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये असला तरी वेळ मात्र हिंदुस्थानचीच ठेवण्यात आली आहे.

हिंदुस्थानचे सर्व सामने रात्रीच

हिंदुस्थानचे साखळीतील सर्व सामने रात्री 7.30 आणि 8 वाजताच खेळविले जाणार आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना या वर्ल्ड कपचा आयपीएलप्रमाणेच मनमुराद आनंद लुटता येणार आहे. हिंदुस्थानचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध न्यूयॉर्क येथे खेळविला जाणार असून तो रात्री 7.30 वाजता सुरू होईल तर उर्वरित तिन्ही साखळी सामने रात्री 8 वाजता खेळविले जाणार आहेत. या चारही लढती स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होतील. त्यामुळे या सामन्यांना स्थानिकची गर्दी कमीच असेल. मात्र जगभरात हिंदुस्थानी क्रिकेटवेडे असल्यामुळे सूर्यप्रकाशात खेळल्या जाणाऱया या लढतींना नक्कीच हाऊसफुल्ल गर्दी असेल, याबाबत आयोजकांना शंभर टक्के खात्री आहे.

आयसीसी टी-20 विश्वचषक वेळापत्रक

अ गट – कॅनडा, हिंदुस्थान, आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका

ब गट  ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नामिबिया, ओमान, स्कॉटलंड

क गट  अफगाणिस्तान, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, युगांडा, वेस्ट इंडीज

ड गट  बांगलादेश, नेपाळ, द. आफ्रिका, नेदरलॅण्डस्, श्रीलंका

दिनांक                            देश     वेळ         ठिकाण

2 जून    अमेरिका वि. कॅनडा            06.00   डल्लास

2 जून    वेस्ट इंडीज वि. पापुआ न्यू गिनी        20.00        प्रोव्हिडन्स

3 जून    नामिबिया वि. ओमान         06.00   ब्रिज टाऊन

3 जून    श्रीलंका वि. दक्षिण आफ्रिका  20.00   न्यूयॉर्क

4 जून    अफगाणिस्तान वि. युगांडा    06.00   प्रोव्हिडन्स

4 जून    इंग्लंड वि. स्कॉटलंड           20.00   ब्रिजटाउन

4 जून    नेदलॅण्ड्स वि. नेपाळ          21.00   डल्लास

5 जून  हिंदुस्थान वि. आयर्लंड    19.30 न्यूयॉर्क

6 जून    पापुआ न्यू गिनी वि. युगांडा  05.00   प्रोव्हिडन्स

6 जून    ऑस्ट्रेलिया वि. ओमान        06.00   ब्रिजटाउन

6 जून    अमेरिका वि. पाकिस्तान      21.00   डल्लास

7 जून    नामिबिया वि. स्कॉटलंड      12.30   ब्रिजटाउन

7 जून    कॅनडा वि. आयर्लंड            20.00   न्यूयॉर्क

8 जून    न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान 05.00   प्रोव्हिडन्स

8 जून    श्रीलंका वि. बांगलादेश        06.00   डल्लास

8 जून    नेदरलॅण्ड्स वि. दक्षिण आफ्रिका         20.00        न्यूयॉर्क

8 जून    ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड         22.30   ब्रिजटाउन

9 जून    वेस्ट इंडीज वि. युगांडा        06.00   प्रोव्हिडन्स

9 जून  हिंदुस्थान वि. पाकिस्तान         20.00      न्यूयॉर्क

9 जून    ओमान वि. स्कॉटलंड          22.30   नॉर्थ साऊंड

10 जून  दक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश         20.00        न्यूयॉर्क

11 जून  पाकिस्तान वि. कॅनडा         20.00   न्यूयॉर्क

12 जून  श्रीलंका वि. नेपाळ             05.00   लाउडरहिल

12 जून  ऑस्ट्रेलिया वि. नामिबिया    06.00   नॉर्थ साऊंड

12 जून अमेरिका वि. हिंदुस्थान   20.00 न्यूयॉर्क

13 जून  वेस्ट इंडीज वि. न्यूझीलंड     06.00   टारुबा

13 जून बांगलादेश वि. नेदरलॅण्ड      20.00   किंग्सटाऊन

14 जून  इंग्लंड वि. ओमान              12.30   ऑण्टिग्वा

14 जून  अफगाणिस्तान वि. पापुआ न्यू गिनी    06.00        टारुबा

14 जून  अमेरिका वि. आयर्लंड          20.00   लाउडरहिल

15 जून  दक्षिण आफ्रिका वि. नेपाळ    05.00   किंग्सटाऊन

15 जून  न्यूझीलंड वि. युगांडा          06.00   टारुबा

15 जून हिंदुस्थान वि. कॅनडा     20.00 लाउडरहिल

15 जून  नामिबिया वि. इंग्लंड          22.30   नॉर्थ साऊंड

16 जून  ऑस्ट्रेलिया वि. स्कॉटलंड      06.00   ग्रॉस आयलेट

16 जून  पाकिस्तान वि. आयर्लंड       20.00   लाउडरहिल

17 जून  बांगलादेश वि. नेपाळ         05.00   किंग्सटाऊन

17 जून  श्रीलंका वि. नेदरलॅण्ड्स       06.00   ग्रॉस आयलेट

17 जून  न्यूझीलंड वि. पापुआ न्यू गिनी          20.00        टारुबा

18 जून  वेस्ट इंडीज वि. अफगाणिस्तान         06.00        ग्रॉस आयलेट

सुपर एट लढती

19 जून  ए-2 वि. डी-1                  20.00   नॉर्थ साऊंड

20 जून  बी-1 वि. सी-2                 06.00   ग्रॉस आयलेट

20 जून  सी-1 वि. ए-1                  20.00   ब्रिजटाउन

21 जून  बी-2 वि. डी-2                 06.00   नॉर्थ साऊंड

21 जून  बी-1 वि. डी-1                 20.00   ग्रॉस आयलेट

22 जून  ए-2 वि. सी-2                  06.00   ब्रिजटाउन

22 जून  ए-1 वि. डी-2                  20.00   नॉर्थ साऊंड

23 जून  सी-1 वि. बी-2                 06.00   किंग्सटाऊन

23 जून  ए-2 वि. बी-1                  20.00   ब्रिजटाउन

24 जून  सी-2 वि. डी-1                 06.00   नॉर्थ साऊंड

24 जून  बी-2 वि. ए-1                  20.00   ग्रॉस आयलेट

25 जून  सी-1 वि. डी-2                 06.00   किंग्सटाऊन

27 जून  पहिली उपांत्य लढत           06.00   प्रोव्हिडन्स

27 जून  दुसरी उपांत्य लढत             20.00   टारुबा

29 जून  अंतिम लढत                     19.30   ब्रिजटाउन

सर्व वेळा हिंदुस्थानी वेळोनुसार दिल्या आहेत