ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद मिशेल मार्शकडे; स्टीव्ह स्मिथला वगळले, जेक फ्रेझरकडे दुर्लक्ष

आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी आज ऑस्ट्रेलियासह अफगाणिस्तान, नेपाळ आणि ओमान या देशांनीही आपापले संघ जाहीर केले आहेत. 1 मे ही वर्ल्ड कपचा संघ जाहीर करण्याची डेडलाईन असूनही पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडीजसारख्या प्रमुख देशांनी आपले संघ जाहीर न केल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते.

ऑस्ट्रेलियाने आज आपला संघ जाहीर करताना अनुभवी स्टीव्हन स्मिथला वगळले असून आयपीएलमध्ये षटकारांची बरसात करणारा जेक फ्रेझर-मॅकगर्कलाही बाहेरच ठेवले आहे. तसेच आयपीएलमध्ये अपयशी ठरूनही ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नरवर आपला विश्वास दाखवत त्यांना संघात कायम ठेवले आहे. अन्य जाहीर संघात अफगाणिस्तानचे नेतृत्व राशीद खानकडे सोपविण्यात आली आहे. तसेच रोहित पौडलला नेपाळचा कर्णधार घोषित करण्यात आला असून आकिब इलियास ओमानचे नेतृत्व सांभाळणार आहे.

पाकिस्तानचा संघ अजूनही अनफिटच

पाकिस्तानी संघातील अनेक खेळाडू अद्याप अनफिट असल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने आपला टी-20 वर्ल्ड कपचा संघ जाहीर केला नसल्याचे बोलले जात आहे, मात्र त्यांनी आयसीसीकडे 15 सदस्यीय प्रातिनिधिक संघ पाठवल्याचे बोलले जात आहे.

ऑस्ट्रेलिया – मिशेल मार्श (कर्णधार), टीम डेव्हिड, ट्रव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), जोश इंगलिस (यष्टिरक्षक), कॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, ऍश्टन एगर, पॅट कमिन्स, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)


नेपाळ – रोहित पौडल (कर्णधार), आसिफ शेख (यष्टिरक्षक), दीपेंद्र सिंग ऐरी, कुशल भुरटेल, संदीप जोरा, करण खत्री छेत्री, कुशल मल्ला, प्रतीश घरती छेत्री, अनिल साह, सोमपाल कामी, अबिनाश बोहरा, गुलसन झा, ललित राजबंशी, कमल ऐरी, सागर धकाल.

अफगाणिस्तान – राशीद खान (कर्णधार), रहमनुल्लाह गुरबाज (उपकर्णधार), इब्राहिम झादरान, मोहम्मद इशाक (यष्टिरक्षक), नजिबुल्लाह झादरान, अजमतुल्लाह ओमरझाई, गुलाबदीन नईब, मोहम्मद नबी, नांगेयालिया खरोटे, फरीद अहमद, फझलहक फारुखी, मुजीबूर रहमान, नवीनुल हक, नूर अहमद.

ओमान – आकिब इलियास (कर्णधार), प्रतीक आठवले (यष्टिरक्षक), खालिद काइल, मेहरान खान, नसीम खुशी, काश्यप प्रजापती, शोएब खान, झिशान मकसूद, अयान खान, मोहम्मद नदीम, बिलाल खान, फय्याज बट, कलीमुल्लाह, शकील अहमद, रफीउल्लाह.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)