जगभरातून थोडक्यात आणि सुटसुटीत बातम्या

घरबसल्या बुक करा रेल्वेचे तिकीट

रेल्वे प्रवाशांना उन्हाळी सुट्टीत एक आनंदाची बातमी मिळाली आहे. रेल्वे प्रवासी आता यूटीएस ऑन मोबाईल
अॅपद्वारे कोठूनही सामान्य प्रवास तिकिटे आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुक करू शकतात. यापूर्वी, प्रवासी केवळ त्यांच्या मोबाईल स्थानावरून 20 किमीच्या परिघात येणाऱया स्थानकांवरून धावणाऱया गाडय़ांसाठी अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुक करू शकत होते. परंतु आता प्रवाशी थेट घरातून तिकीट बुक करू शकतील. उन्हाळ्यात रेल्वे प्रवाशांना तिकीट काढणे सोयीचे जावे यासाठी रेल्वेने तिकीट बुकिंगची बाह्य मर्यादा काढून टाकली आहे. यूटीएस अॅपद्वारे प्लॅटफॉर्म आणि रिझर्व्हेशन तिकीट बुक करणे सोपे झाले आहे.

100 शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी

दिल्ली – एनसीआरमधील 100 हून जास्त शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली पब्लिक स्कूल (द्वारका), संस्कृती स्कूल, मदर मेरी स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल नोयडा आणि दिल्ली पब्लिक स्कूल (आरके पुरम) या प्रमुख शाळांना धमकीचे ईमेल आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांनी विद्यार्थ्यांनी परत घरी पाठवले आहे. डॉग स्कॉड आणि दिल्ली पोलिसांनी संबंधित शाळांमध्ये पोहोचून शाळा परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबविले. सोमवारपासून आतापर्यंत दिल्लीतील अनेक शाळांना ई-मेल पाठवण्यात आले आहेत. सर्वांचा पॅटर्न सारखाच दिसून येत आहे.

वीस हजार पाकिस्तानींची विदेशातून हकालपट्टी

गंभीर गुन्हे करणाऱया पाकिस्तानी नागरिकांची अनेक देशांमधून हकालपट्टी झाली आहे. पाकिस्तानी संसदेच्या सिनेटमध्ये यासंदर्भातील अहवाल सादर झाला आहे. अहवालावरून असे दिसतंय की, मागील तीन वर्षांत 20 हजार पाकिस्तानींना चोरी, दरोडा, बलात्कार, अतिरेकी संघटनांशी लागेबांधे अशा गंभीर आरोपांमुळे शिक्षा देऊन पाकिस्तानमध्ये हाकलले आहे. तुकाa, ग्रीस, इटली, अमेरिका अशा 134 देशांमधून गुन्हेगार पाकिस्तानींची हकालपट्टी झालेय. तुकाa देशातून सर्वाधिक म्हणजे 600पाकिस्तानींना हाकलले. त्यांच्यावर महिलांचे लैंगिक शोषण, बलात्कार, चोरी, दरोडा, मनी लाँड्रिंग असे गुन्हे दाखल आहेत.

एअरपोर्टवर पाणीपुरी 333 रुपये!

चटपटीत पाणीपुरी म्हणजे सर्वांना प्रिय अशी खिशाला परवडणारी डीश. अगदी 30 ते 40 रुपयांत पाणीपुरी सहज मिळते. मुंबई विमानतळावर हीच पाणीपुरी 333 रुपयांना विकली जात असल्याचा पह्टो व्हायरल झाला आहे. यामुळे नेटकरी चक्रावले आहेत. काwशिक मुखर्जी नावाच्या व्यक्तीने एक्स हॅण्डलवरून मुंबई विमानतळावरील स्टॉलच्या डिस्प्ले बोर्डाचा पह्टो शेअर केला आहे. त्यामध्ये पाणीपुरी, शेव पुरी आणि दहीपुरीची किंमत प्रत्येकी 333 रुपये दिसत आहे. या पोस्टमुळे विमानतळावर मिळणाऱया खाद्यपदार्थांच्या किंमतीवर चर्चा रंगली आहे. 50 हजार रुपयांचे विमानाचे तिकीट काढणाऱया प्रवाशांना एवढे पैसे जास्त नाहीत, असे काहींचे म्हणणे आहे.

‘बाहुबली’ येतोय नव्या सीरिजमध्ये!

एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. या चित्रपटाची व्रेझ अद्याप कायम आहे. यामुळे राजामौली यांनी महत्त्वाची घोषणा केली. लवकरच बाहुबली चित्रपटावर आधारित एक ऑनिमेटेड सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर करत या ऑनिमेटेड सीरिजची घोषणा केली आहे. आगीच्या धुरातून प्रकट होणारे बाहुबलीचे शीर्षक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. ‘बाहुबली ः द क्राऊन ऑफ ब्लड’ असे या सीरिजचे नाव असून या सीरिजचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बाहुबली सिनेमाच्या दोन्ही पार्टवर ही सीरिज आधारित आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने ठोठावला 7 लाखांचा दंड

पॉर्न स्टार्सना पैसे देऊन गप्प केल्याच्या आरोपाखाली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोषी आढळले. याप्रकरणात न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना 7 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. साक्षीदार, न्यायदंडाधिकारी आणि खटल्याशी संबंधित काही लोकांबद्दल सार्वजनिक विधाने करण्यास न्यायालयाने ट्रम्प यांना मनाई केली होती. ट्रम्प यांनी पुन्हा असे केल्यास त्यांना तुरुंगवास भोगावा लागू शकतो, असा इशारा न्यायालयाने दिला. 2016 च्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीपूर्वी एका पॉर्न स्टारसोबत अफेअर ठेवल्याच्या आणि त्यांना गप्प राहण्यासाठी पैसे दिल्याच्या आरोपावरून ट्रम्प यांच्याविरोधात हा खटला सुरू आहे. आगामी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीआधीच ट्रम्प यांना ही शिक्षा ठोठावली आहे.

विप्रोच्या नव्या सीईओचा पगार 58.40 कोटी रुपये

विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांना 4.5 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 58.40 कोटी रुपये वार्षिक पॅकेज दिले आहे. विप्रोने सोमवारी याचा खुलासा बीएसईवर पोस्ट करण्यात आलेल्या शेअरधारकांच्या नोटिसीत केला. श्रीनिवास पल्लिया यांनी 7 एप्रिलला पाच वर्षांसाठी सीईओ आणि एमडीचा पदभार स्वीकारला आहे. पल्लिया हे अमेरिकेत राहणार असून ते विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांना रिपोर्ट करतील. पल्लिया यांच्या पॅकेजमध्ये 1.7 ते 3 मिलियन डॉलरपर्यंत बेसिक सॅलरीचा समावेश आहे. यासोबत दरवर्षी 1.7 मिलियन डॉलर ते 3 मिलियन डॉलरच्या टीव्हीपीचा समावेश आहे. सॅलरी पॅकेजमध्ये 4 मिलियन डॉलरचा स्टॉक अवॉर्ड तीन वर्षांत विभागला जाणार आहे. 2024 मध्ये 25 टक्के, 2026 मध्ये 25 टक्के, 2027 मध्ये 50 टक्के दिले जाणार आहे.