IPL 2024 – आता 200 धावाही झाल्या माफक

आयपीएलचा प्रत्येक सामना ‘अब की बार 300 पार’च असाच आवाज देतोय. हैदराबादने तर तीन वेळा या धावसंख्येसमीप पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, पण ते 287 धावांपर्यंतच पोहोचू शकले. इम्पॅक्ट प्लेअरमुळे वेगवान झालेल्या आयपीएलमध्ये 200 धावांचे आव्हानही अत्यंत छोटे भासू लागले आहे. 48 सामन्यांत चक्क 27 वेळा संघांनी 200 धावांचा आकडा गाठलाय. अशी कामगिरी गेल्या 16 मोसमात कधीही झाली नव्हती. एवढेच नव्हे तर 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग याच मोसमात चारदा झालाय, जो एक विक्रमच आहे.

यंदाचे आयपीएल सर्वच बाबतीत आगळंवेगळं आणि विक्रमी ठरतेय. धावांचे, षटकारांचे, शतकांचे असे अनेक विक्रम या आयपीएलमध्ये सहज मोडले जाणार आहेत. पण त्याचबरोबर एकाच मोसमात 200 पेक्षा अधिक वेळा ही मजल मारण्याचा विक्रम याच आयपीएलमध्ये रचला गेला आहे. हैदराबादने जबरदस्त आणि झंझावाती खेळ करताना चक्क चारवेळा 200 चा आकडा गाठला आहे. पण त्यांच्याच इतकी कामगिरी चेन्नईनेही केलीय. फलंदाजांच्या आक्रमकपणामुळे यंदा आयपीएलमध्ये तीनशेपार नक्कीच पाहायला मिळेल.

IPL 2024 – पंजाबने चेन्नईसुद्धा जिंकले

चार वेळा यशस्वी द्विशतकी पाठलाग

ईडन गार्डनवर कोलकाता आणि पंजाब यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात धावांचा आणि षटकारांचा विश्वविक्रमी पाऊस पडला होता. कोलकात्याच्या 262 धावांचा पाठलाग पंजाबने 8 चेंडू आधीच पूर्ण करताना यशस्वी पाठलागाचा नवा विश्वविक्रम रचला. याच मोसमात हैदराबादच्या 287 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूने 7 बाद 262 अशी मजल मारली. त्याचप्रमाणे बंगळुरू कोलकात्याच्या 223 धावांचा पाठलाग करताना अवघ्या एका धावेने हरले. विशेष म्हणजे 200 पेक्षा मोठय़ा धावसंख्येचा पाठलाग करताना सहा संघांनीही 200 पेक्षा अधिक मजल मारली, पण त्यांना विजयी लक्ष्य गाठता आले नाही. मात्र चार संघ यशस्वी पाठलाग करू शकले. एकाच मोसमात कधीही चारवेळा दोनशेपेक्षा अधिक धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग झाला नव्हता. त्यामुळे या मोसमात 200 धावांचे आव्हान फारच माफक आणि छोटे भासू लागले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)