
दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी सध्या मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांवर उसळत आहे. ही स्थिती लक्षात घेत रेल्वे स्थानकांतील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने प्रमुख स्थानकांवर पुढील 10 दिवसांसाठी फलाट तिकीट दरात पाच पट वाढ केली आहे. यामुळे 10 रुपयांच्या फलाट तिकिटासाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर तसेच ठाणे, कल्याण आणि पनवेल या सहा स्थानकांसाठी हे फलाट तिकीट दर लागू असणार आहेत. उद्या (शनिवार) 22 ऑक्टोबरपासून ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी हे दर आहेत.





























































