FIFA World Cup 2022 कतारमध्ये जंग-ए-फुटबॉल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये आजवर अनेक युद्ध लढली गेली आहेत, सहन केली गेली आहेत त्याच मुस्लिम राष्ट्रामध्ये पहिल्यांदाच ‘फुटबॉल-ए-जंग’ रविवारपासून सुरू होतेय. जगभरातील अव्वल 32 संघांचा समावेश असलेल्या या युद्धात अल बयात स्टेडियमवर होणाऱ्या इक्वाडोरविरुद्ध सलामीच्या सामन्यात फतेह मिळविण्यासाठी यजमान कतार सज्ज झालाय. महिनाभर चालणाऱ्या युद्धात फक्त  किकचे हल्ले आणि गोलचे बॉम्बहल्लेच चढवले जातील. हाच थरार पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी अवघं विश्व कतारमय झाल्याशिवाय राहणार नाही.

कतार काळजात घुसला

वर्ल्ड कपचा थरार सुरू होण्याआधीच जगभरातून आलेले लाखो फुटबॉलप्रेमी कतार सरकारच्या कठोर नियमांमुळे घायाळ झालेत…

बीअर प्या, पण…

मॅचदरम्यानही अल्कोहोलयुक्त बीअर पिण्यावर आणि विकण्यावर बंदी लादली आहे, मात्र अल्कोहोल फ्री बीअर स्टेडियममध्ये मिळेल.

ड्रग्जवर बंदी

ड्रग्जसेवनाबाबतही कतारमध्ये कठोर नियम आहेत. त्यानुसार बेकायदशीर ड्रग्ज विक्री आणि सेवनावरही बंधने घातली आहेत.

अंग झाकणारे कपडे घाला

कतारच्या संस्कृतीचा आदर ठेवण्यासाठी खांदे आणि गुडघे झाकले जातील असे कपडे परिधान करावेत, असे आदेशच दिले आहेत.

आक्षेपार्ह खाणाखुणाही नेणार तुरुंगात

पोलीस किंवा अन्य अधिकाऱ्यांशी व्यवहार करताना मधले बोट दाखवले तर थेट तुरुंगात रवानगी होईल.

हिंदुस्थानात स्पोर्टस् 18 आणि जिओ सिनेमा अॅपवर प्रक्षेपण

आजची लढत – कतार वि. इक्वाडोर, रात्री 9.30 वाजता