हिमाचल प्रदेशात दोन ट्रकची समोरासमोर धडक; अपघातात 4 जण ठार, 7 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमाचल प्रदेशातील चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावरील हनोगी बोगद्यात गुरुवारी सकाळी दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार जण ठार झाले, तर सात जण जखमी झाले आहेत. सकाळी पावणेआठच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नेरचौक मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. घटनास्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे.