बुधवारी सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण झाली आहे. सराफा बाजारात एक किलो चांदीच्या किंमतीत 5 हजार 772 रुपयांनी घसरण होऊन 2 लाख 27 हजार रुपये किलो झाली आहे. तर 24 पॅरेट सोने 1196 रुपयांनी स्वस्त होऊन 1 लाख 53 हजारांपर्यंत खाली आले आहे.
गेल्या 10 ते 15 दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. परंतु, बुधवारी सोने स्वस्त झाले आहे. सोन्यात गुंतवणूक करणाऱयांनी नफावसुली केल्यामुळे सोने-चांदी स्वस्त झाली आहे. या वर्षी सोने-चांदीच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोने या वर्षी आतापर्यंत 20 हजार रुपयांनी महाग झाले आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी एका तोळ्याची किंमत 1 लाख 33 हजार रुपये होती. तर चांदीच्या किंमतीत 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदी 31 डिसेंबर 2025 रोजी 2 लाख 30 हजार रुपये किलो होती.


























































