फ्रान्स पुढे चाल करण्यासाठी सज्ज, आज डेन्मार्कविरुद्ध लढत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिफा वर्ल्ड कपच्या सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा 4-1 ने धुव्वा उडवणारा जगज्जेता फ्रान्सचा संघ उद्या स्टेडियम 974 वर डेन्मार्कविरुद्धही विजयासाठीच उतरणार आहे. सलग दुसऱया विजयासह सर्वप्रथम उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्याचे ध्येयच फ्रान्सने समोर ठेवले आहे. दुसरीकडे टय़ुनिशियाविरुद्ध बरोबरीत अडकलेल्या डेन्मार्कसाठी फ्रान्सला रोखणे, हेच मुख्य ध्येय असेल.

पहिल्याच लढतीत दोन गोल ठोकणाऱया फ्रान्सच्या ऑलिव्हिएर जिरूच्या खेळावर सर्वांचेच लक्ष लागले आहे. डेन्मार्कविरुद्ध गोल आणि विजय नोंदवून जिरू फ्रान्सचा सर्वाधिक गोल करणाऱया खेळाडूचा मान मिळवेल हे निश्चित आहे. मात्र किलीयान एम्बाप्पेचा बहारदार खेळही फ्रान्ससाठी फार महत्त्वाचा असेल.

डेन्मार्कला स्पर्धेत राहायचे असेल तर त्यांना फ्रान्सवर विजय मिळविणे आवश्यक असेल. जर ते उद्याही विजयाला गवसणी घालू शकले नाही तर त्यांचा पुढचा प्रवास अधिक खडतर होईल.

आजच्या लढती
टय़ुनिशिया वि. ऑस्ट्रेलिया (दुपारी 3.30 वा.)
पोलंड वि. सौदी अरेबिया (सायं. 6.30 वा.)
फ्रान्स वि. डेन्मार्क (रात्री 9.30 वा.)
अर्जेंटिना वि. मेक्सिको (मध्यरात्री 12.30 वा.)