
जॉन अब्राहम हा अनेकांचा आवडता अभिनेता. बऱ्याचदा तो प्रत्यक्षात चाहत्यांसमोर येतो तेव्हा फ्रेंडली वागताना दिसतो. त्याचे असे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. नुकताच त्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात तो त्याच्या चाहत्याच्या हातातून मोबाईल खेचून घेताना दिसत आहे.
View this post on Instagram
जॉन रस्त्यावरून जात असताना त्याचे दोन चाहते त्याचा लपून व्हिडीओ काढत होते. ते जॉनने बघितले व त्याने हसत हसत त्यांच्या हातून फोन घेतला. त्यानंतर त्याने स्वत:चा व्हिडीओ रेकॉर्ड केला व त्यात ते चाहते त्याचे मित्र असल्याचे सांगितले. त्याचे चाहते देखील त्याच्या या दिलखुलास वागण्याने खूश झाले.
जॉन लवकरच आपल्याला त्याच्या सत्यमेव जयते या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात जॉनचा ट्रिपल रोल असून त्याच्यासोबत दिव्या कुमार खोसला दिसणार आहे. हा चित्रपट 25 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.




























































