ज्ञानवापी येथील ASI चे सर्वेक्षण 26 जुलै पर्यंत थांबवले, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एएसआयच्या सर्वेक्षणावर बंदी घातली आहे. ही बंदी 26 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाला आजच उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले. तसेच स्थगितीची तारीख संपण्यापूर्वी उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करावी, असेही सांगितले. सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान सांगितले की, मुस्लिम पक्षाला श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. तसेच सॉलिसिटर जनरल म्हणाले की, आम्ही बोललो आहोत. आठवडाभर खोदकाम होणार नाही. अजून एक वीटही काढलेली नाही. सर्वेक्षण, व्हिडिओग्राफी व मॅपिंग आदी कामे करण्यात येत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, काशी विश्वनाथ मंदिराच्या शेजारी असलेली मशीद मंदिराच्या वर बांधली गेली आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी ASI चे 30 सदस्यीय पथक आज सकाळी वैज्ञानिक सर्वेक्षणासाठी ज्ञानवापी परिसरात दाखल झाले.

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपीलात मुस्लिम पक्षाने सांगितले की, शुक्रवारी ASI सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले होते. आम्हाला अपील करण्याची संधीही देण्यात आली नाही. आज सकाळी 7 वाजल्यापासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. एएसआयच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी आम्हाला दोन दिवसांचा अवधी द्यावा, असे मुस्लिम पक्षाने म्हटले आहे.

यावर सॉलिसिटर जनरल म्हणाले की आम्ही बोललो आहोत. आठवडाभर ज्ञानवापी परिसरात खोदकाम होणार नाही. अजून एक वीटही काढलेली नाही. सर्वेक्षण, व्हिडिओग्राफी व मॅपिंग आदी कामे करण्यात येत आहेत. यावर CJI म्हणाले की मग आम्ही ASI चे म्हणणे नोंदवू आणि मुस्लिम पक्षाला अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी देऊ. यावर सॉलिसिटर जनरल म्हणाले की, धार्मिक चरित्र बदलेल असे सध्या काहीही घडत नाही. त्यामुळे मुस्लिम पक्ष दोन-तीन दिवसांत उच्च न्यायालयात जाऊ शकतो.