
छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे शुक्रवारी भगवान जगन्नाथांची भव्य रथयात्रा उत्साहात पार पडली. या सोहळ्यात मुंबईसह विविध भागांतील शेकडो भाविकांनी सहभाग घेतला. भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांच्या आकर्षक सजविलेल्या रथाची छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते शिवसेना भवन, प्रभादेवी, गोखले रोड, रानडे रोड मार्गे भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण मार्गाकर भजन, कीर्तनाच्या जयघोषाने दादर परिसर भक्तिमय झाला.




























































