तो घरी आला की घट्ट मिठी मारेन, औक्षण करेन! अभिजीत दीपके यांच्या आईला आनंदाश्रू अनावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज खूप आनंद झालाय, अभिजीतच्या प्रामाणिकपणाला आणि त्याच्या कष्टाला अखेर यश आले आहे. गेले काही दिवस आम्हाला रात्रीची झोपही येत नव्हती. सकाळी उठल्यावर फोन हातात घेताना धडधडायचे. कोणती वाईट बातमी किंवा व्हिडीओ समोर येईल या भीतीने मन व्याकुळ व्हायचे, असे अभिजीतची आई म्हणाली. यावेळी अभिजीतच्या आईला आनंदाश्रू अनावर झाले. आता त्याने लवकरात लवकर घरी यावे. तो आला की त्याला घट्ट मिठी मारेन. यापूर्वी त्याने स्वतःला ओवाळू दिले नव्हते, ‘मम्मी, मी काही मोठा पराक्रम केलेला नाही’ असे तो म्हणायचा. पण आता मी त्याचे औक्षण करणार आहे. हा विजय केवळ अभिजीतचा नसून, या आंदोलनातील प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे, असेही अभिजीतच्या आईने म्हटले.