INDvsNZ टीम इंडियाला धक्का, केएल राहुल संपूर्ण मालिकेतून बाहेर; ‘या’ खेळाडूची लॉटरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 25 नोव्हेंबरपासून कानपूर येथे सुरू होणार आहे. या कसोटीची तयारी सुरु असतानाच हिंदुस्थानच्या संघाला तगडा धक्का बसला आहे. सलामीवीर खेळाडू केएल राहुल जायबंदी झाल्याने तो संपूर्ण मालिकेतून बाहेर फेकला गेला आहे.

केएल राहुल याच्या डाव्या मांडीची स्नायू खेचले गेले आहेत. त्यामुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. केएल राहुल याच्या जागी सूर्यकुमार यादव याची संघात निवड करण्यात आली आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

क्रिकेटमधील दुर्मीळ क्षण, सर्व 11 खेळाडूंनी केली गोलंदाजी; एकदा नाही चारदा ‘असं’ घडलंय

दुखापतीमुळे केएल राहुल हा विश्रांती घेणार आहे. मात्र पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तो उपलब्ध असेल. परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत राहुलची कमतरता टीम इंडियाला जाणवेल. राहुलने आतापर्यंत 40 कसोटी सामने खेळले असून यात त्याने 35.16 च्या सरासरीने 2321 धावा केल्या आहेत. 199 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

सूर्याची लॉटरी

2021 हे वर्ष सूर्यकुमारसाठी नवी सकाळ घेऊन आले. कारण याच वर्षी त्याने टी-20 आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आता वर्ष संपता-संपता त्याची कसोटी संघातही निवड झाली आहे. मात्र कानपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटीत त्याचा अंतिम 11 खेळाडूंमध्ये समावेश होतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

पहिल्या कसोटीसाठी हिंदुस्थानचा संघ –

अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.