
सामना ऑनलाईन । मुंबई
सध्या चित्रपटसृष्टीत मोठे अभिनेते, अभिनेत्री यांच्या लग्नाच्या बातम्यांनी आनंदाचे वातावरण आहे. दीपिका पदुकोण व प्रियंका चोप्ना यांनी लग्नाची बातमी दिलेली असतानाच आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने तिच्याकडे गुड न्यूज असल्याची एक सूचक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिनेत्री प्रिया बापटने तिचा व उमेशचा एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत ‘एक गोड बातमी आहे’ अशी पोस्ट टाकली आहे. तिच्या या पोस्टवरून प्रियाच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे का याची चर्चा सुरू झाली आहे.
जवळपास सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया व उमेश 2011 मध्ये लग्नबंधनात अडकले. हे दोघे मराठी चित्रपटसृष्टीत ‘परफेक्ट कपल’ म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी हे दोघे एका चित्रपटात एकत्र काम करणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे प्रियाची ही पोस्ट म्हणजे खरचं गूड न्यूज आहे की कुठल्या चित्रपटाचे प्रमोशन हे अद्याप समजलेले नाही.




























































