इस्रायलमध्ये सापडलं शापित थडगं, लाल अक्षरात लिहिली आहे ‘ही’ सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भुताच्या चित्रपटांमध्ये दाखवलं जातं तसाच एक प्रकार इस्रायलमध्ये घडला आहे. येथील पुरातत्व संशोधकांना एक विलक्षण थडगं सापडलं आहे. त्यावर एक विशेष सूचना लिहिली आहे.

हे थडगं 1800 वर्षं जुनं आहे. इस्रायलच्या बेइत शे अरीम या परिसरातील एका दफनभूमीत हे थडगं सापडलं आहे. ही दफनभूमी जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखली जाते. गेल्यावर्षीपासून इथे पुरातत्व विभागाचं उत्खनन सुरू होतं.

या ठिकाणी गेल्या 65 वर्षांपासून जितकं उत्खनन झालं, तेवढ्या काळात इथे सापडलेलं हे पहिलं थडगं आहे. या थडग्यावर एक सूचना दिली आहे. या सूचनेत, याकोव हगेर अशी प्रतिज्ञा करतो की जो कुणी हे थडगं उघडेल, त्याला तो शाप देईल. त्यामुळे कुणीही ही थडगं उघडू नये, असं या थडग्यावर लाल अक्षरांनी लिहिलं आहे.

पुरातत्व संशोधकांच्या म्हणण्यानुसार, थडगी उकरून त्यातून किमती ऐवज चोरणाऱ्यांना रोखण्यासाठी ही सूचना आहे. तसंच, एकाच थडग्यात अनेक मृतदेह पुरण्यापासून रोखण्यासाठी देखील या सूचनेचा वापर केला जात होता.