जिओच्या खास ग्राहकांना 8 जीबी डेटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रिलायन्स जिओकडून प्रत्येक महिन्यात खास ग्राहकांना सेलिब्रेशन पॅकअंतर्गत मोफत 8 जीबी डेटा मिळतो. यावेळीही खास ग्राहकांना जिओ फ्री डेटा देणार आहे. दररोज 2 जीबी डेटा असे चार दिवस म्हणजे एकूण 8 जीबी डेटा ग्राहकांना फुकट मिळणार आहे.

फ्री डेटा मिळला की नाही हे तपासण्यासाठी ‘माय जिओ’ अॅपमध्ये लॉगइन करावे लागेल. लॉगइन झाल्यावर माय प्लॅन सेक्शनमध्ये फ्री डेटा तपासावा. जर ग्राहकांना माय प्लॅनमध्ये फ्री डेटा दिसला नाही तर रात्री 12 वाजेपर्यंत काट बघावी लागेल. कारण दररोज रात्री 12 नंतर माय प्लॅन रिफ्रेश केला जातो. जिओ सेलिब्रेशन पॅक गेल्या काही वर्षांपासून ग्राहकांना मिळत आहे.