कर्जत नगरपालिका निवडणूक : शिवसेनेचे नितीन सावंत यांची हॅटट्रीक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कर्जत

कर्जत नगरपालिकेवर शिवसेनेने प्रचंड मोठा विजय मिळविला आहे. शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या 18 पैकी 10 जागा जिंकून नगरपालिकेवर भगवा फडकविला. नगराध्यक्ष पदाच्या प्रतिष्ठेच्या लढाईत शिवसेनेच्या सुवर्णा केतन जोशी यांनी महाआघाडीच्या उमेदवार प्रतीक्षा सुरेश लाड यांचा 2694 मतांनी पराभव केला.

कर्जत नगरपालिकेत 25 वर्षानंतर सत्ता परिवर्तन, शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला

महायुतीमध्ये जिंकलेल्या 10 जागांमध्ये शिवसेना-4, भाजप-4 आणि आरपीआय-2 अशा जागा निवडून आल्या. यात शिवसेनेचे उमेदवार नितीन सावंत यांनी सलग तिसऱ्यांदा विजयश्री खेचून आणत नगरसेवक होण्याचा मान मिळवला. प्रभाग चारमधून निवडून आलेले शिवसेनेचे उमेदवार नितीन सावंत हे सलग तीन वेळा निवडून येऊन त्यांनी हॅट्रिक केली आहे. तीनही वेळा वेगवेगळ्या प्रभागातून निवडून येण्य़ाचा करिष्मा त्यांनी करून दाखविला आहे.

2009 साली त्यांनी विठ्ठल नगरमधून निवडणूक लढवली आणि जिंकलेही, तर 2014 साली ते कोतवाल नगर आणि बाजारपेठ या प्रभागातून निवडून आले तर. यावेळी मात्र वॉर्ड रचना आणि आरक्षण यामुळे त्यांना त्यांचा हक्काचा प्रभागच राहिला नाही. पण या कडव्या शिवसैनिकाने हार मानली नाही आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात बिनधास्तपणे लढत विजयश्री खेचून आमली.

राष्ट्रवादीचे म्हाळारी माने यांचा त्यांनी 327 मतांनी पराभव करून दाखवून दिले की मी कोठेही उभा राहिलो तर निवडून येऊ शकतो एवढे प्रेम कर्जतकर माझ्यावर करत आहेत. नितीन सावंत यांना 1050 मते मिळाली तर म्हाळारी माने यांमना 723 मते मिळाली.