सार्वजनिक बांधकाम विभागाच्या छतावर ताडपत्र्या, इतर इमारतींची छत उभारणाऱ्या बांधकाम विभागावर गळतीची वेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाच्या, उनपावसापासून संरक्षण करून शासकीय इमारती उभारणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचीच अवस्था दयनीय झाली आहे. रत्नागिरीतील उत्तर विभागाच्या कार्यालयात पावसामुळे प्रचंड गळती सुरु आहे. त्यामुळे कार्यालयाच्या छतावर चक्क ताडपत्र्या टाकण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागावर आली आहे.

अनेक प्रशासकीय इमारतीमध्ये पावसाळ्यात गळती सुरु होते. या गळतीमुळे अधिकाऱ्यांसह कर्मचारी त्रस्त होत असतात. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने शिमगा केला जातो. इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याबाबत ओरड होते. आता मात्र चक्क सार्वजनिक बांधकाम विभागालाच या पावसाच्या गळतीला सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभागाच्या कार्यालयाच्या छताची अवस्था दयनीय झाली आहे. मोठ्या प्रमाणात गळती होत असल्यामुळे छतावर मोठमोठ्या ताडपत्र्या टाकण्यात आल्या आहेत…