आम्ही त्यांच्या मानगुटीवर बसणार आहोत; लालूप्रसाद यादव यांचा मोदींवर हल्लाबोल

राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करत आहेत. याआधीही अनेकदा त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. आता मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी रवाना होताना पाटण्यात विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी आम्ही आता त्यांच्या मानगुटीवर बसणार आहोत, त्यांना आता हटवावेच लागणार आहे, अशा शब्दांत लालूप्रसाद यादव यांनी मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या विधानाने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

लालूप्रसाद यादव गेल्या काही काळापासून केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत. इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. विरोधकांच्या आघाडीचे इंडिया असे नामकरण केल्याने भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पूर्ण देशभरात आम्ही एकजुटीने भाजपविरोधात लढणार आहोत. या निवडणुकांमध्ये भाजप आणि इंडिया आघाडीचा उमेदवार यांच्यात थेट लढत होणार आहे. आमच्या इंडिया आघाडीची चर्चा देशभरात होत आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे, असा विश्वासही लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मिटवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आम्ही एकजुटीने त्यांच्याविरोधात उभे ठाकले आहोत. आमम्ही देशाची अंखडता कायम राखणार आहोत. स्वातंत्र्यांच्या लाढईप्रमाणेच आता लोकशाही जपण्याची लढाई आहे, त्यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.