भूसंपादन सहायकाला लाचप्रकरणात अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

भूसंपादनच्या महसूल सहायकाला चार हजारांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. मंगेश विजय ढुमणे (वय 41, रा. सिव्हिल हडको, नगर) असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदाराने आईच्या नावे घेतलेल्या जमिनीच्या अकृषिक परवानगीकरिता ना हरकत प्रमाणपत्रासाठी भूसंपादन विभागात प्रकरण दाखल केले होते. ना हरकत प्रमाणपत्र दिल्याने ढुमणे याने तीन हजारांची मागणी केली होती. तसेच तक्रारदाराच्या मित्राच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठीही तीन हजारांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पडताळणीदरम्यान ढुमणे याने दोन्ही कामांचे एकत्रित चार हजार मागितले होते. त्यानंतर चार हजारांची लाच घेताना त्याला पकडण्यात आले.