
दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांना पोलिसांनी थांबवले असता एकजण पळून गेला. दोघांकडून एक पिस्तूल, काडतुसांसह सुमारे 55,3970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील कन्हेरी चौकात कन्हेरी गावात जाणार्या रस्त्यावर आकाश आण्णासाहेब होदाडे (25, रा. कवठा ता. औसा जि. लातूर सध्या रा.प्रकाश नगर लातूर), महादेव रावसाहेब फड (26, रा. भामाची वाडी ता. उदगीर सध्या रा.माताजी नगर लातूर) आणि खंडू पांढरे (रा. माताजी नगर) हे दुचाकीवरून जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले. पोलीस पाहून खंडू पांढरे पळून गेला.
दोघांकडून पोलिसांनी आकाश होदाडे यांच्याकडून एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस, मोबाईल 1 लाख 50 हजार रुपयांचा तर दुसरा मोबाईल 90 हजार रुपयांचा जप्त करण्यात आला तसेच रोख रक्कम 48,570 रुपये, महादेव फड याच्या ताब्यातून एक बुलेट मोटारसायकल, एक मोबाईल असा 553970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































