लातूरमधील मोठा घोटाळा उघड, बनावट कंपन्या आणि प्रमाणपत्रांच्या आधारे 2143 कोटी रुपयांचा निधी परदेशात पाठवला; सीएसह 16 कंपन्यांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जाणीवपूर्वक शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट कंपन्या तयार करण्यात आल्या. बनावट कागदपत्रे बनवली गेली आणि तब्बल 2143 कोटी रुपये परदेशात पाठवण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या धाडीनंतर उदगीर येथील सीए श्याम शिवप्रसाद कालानी याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील आयकर विभागाचे उपसंचालक दीपक कुमार यांच्या फिर्यादीवरून उदगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परदेशात एकूण 16 कंपन्यांच्या मार्फत पैसे पाठवण्यात आलेले आहेत. या सर्व कंपन्या बोगस तयार करण्यात आलेल्या आहेत. या कंपन्यांची नावे व पाठवण्यात आलेली रक्कम पुढीलप्रमाणे आहे. जान्हवी कॉम्पुटरनिक्स प्रायव्हेट लिमिटेड 619192 250, नेक्स्ट मॅटिक टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड 280 32 224, टेकडे मौन्झ प्रायव्हेट लिमिटेड 13 51 59 648, ईगल आयआयटी सोल्युशन बिना सुरेश कॉल 29203680, वीरभद्रा टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड 6575115, नेक्स्ट इनोस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड 7518972890, इन्पहसिस आयटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 5772335407, जेवलोस्कोप सॉफ्टवेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड 866622420, क@लकोन कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड 11795243600, एज ऑफ टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड 5215396160, विजिटेक इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड 292293011, ब्रोकोडर्स आयटी सोल्युशन्स जतिन प्रवीण भाई परमार 836680, टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड 42174280, ईगल आय सोल्युशन्स हेमंत शाहू 204280, एचसीएल टेक्नो सनी धर्मेंद्र सिंह 92059395, इन्फा इंजीनिअरिंग अँड एक्झिक्युशन कन्सल्टन्सी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड 14274080, या 16 कंपन्यांच्या नावे एकूण 2143 कोटींचा गैरव्यवहार सीए श्याम कालानी यांनी केला आहे. एकूण 1810 बोगस प्रमाणपत्रे वाटप केलेली आहेत.

पडताळणी न करताच कागदपत्रे तयार

आवश्यक असलेली कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे ही कालानी याने तयार करून दिली आहेत. हे करत असताना त्याने सर्व नियम धाब्यावर बसवले असून, या संबंधित कंपन्या नेमक्या कुठे आहेत, त्यांचा व्यवसाय काय आहे त्यांच्या खात्यातील पैशांचा स्रोत काय आहे. किंवा परदेशात निधी पाठविण्याचे कारण काय या बाबी समोर आलेल्या नाहीत. मात्र, आवश्यक पडताळणी न करताच कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही

सीएने तयार केलेली कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे बँकेसमोर सादर झाल्यानंतर संबंधित व्यवहारांना बँकिंग प्रक्रियेत पुढे जाता आले आणि त्यानंतर या सोळा कंपन्यांच्या खात्यांमधून तब्बल 2143 कोटी 19 लाख 43 हजार 730 रुपये भारताचे देशाबाहेर पाठविण्यात आले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे; परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे तपशीलअधिकारी भागीरथी पवार, पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा लातूर यांनी दैनिक सामनाशी बोलताना सांगितले.