
एलआयसीने कमी हप्त्यांत जास्त फायदेशीर, भरलेल्या संपूर्ण मूळ रकमेत अधिक फायदा देणारी बिमा रत्न (प्लॅन 864) पॉलिसी सर्वसामान्यांसाठी आणली आहे. यात जीवन विम्याबरोबर गुंतवणुकीचाही विचार करण्यात आला आहे. ही पॉलिसी 15, 20 आणि 25 वर्षांसाठी असून दुर्दैवाने पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास 125 टक्के मूळ बेसिक रक्कम दिली जाणार आहे. पॉलिसीधारकाला यावर एलआयसीकडून कर्जही घेता येणार आहे. 90 दिवसांच्या मुलांपासून ते 5 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी घेऊ शकते.




























































