महिला ट्रेकर्सनी अशाप्रकारे घ्या hygieneची काळजी

गिर्यारोहण हे साहसी आणि आनंददायी आहे परंतु त्यात महिलांसाठी फार आव्हाने देखील असतात. विशेषत: जेव्हा प्रवासात वाटेत महिलांच्या आरोग्यविषयक स्वच्छता राखण्याचा प्रश्न येतो तेव्हा तर हे प्रामुख्याने जाणवते. ट्रेकिंगमध्ये  ताजेतवाने आणि उत्साही वाटण्यासाठी अमृतांजन हेल्थकेअरच्या तज्ञांकडून या 10 अत्यावश्यक आणि उपयुक्त टिप्स जाणून घेऊया.

वेट वाइप्स घ्या : प्रवासात ताजेतवाने राहण्यासाठी बायोडिग्रेडेबल म्हणजेच निसर्गात व्यवस्थित विघटन होणारे पदार्थ असलेले, सुगंध नसलेले वेट वाइप्स निवडा. स्वच्छतागृहात जाऊन आल्यानंतर जलद साफसफाईसाठी किंवा घामाघूम करणाऱ्या चढाई नंतर चेहरा आणि हात पुसण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरतात.
ओलावा टिपून घेणारी अंतर्वस्त्रे निवडा : उच्च-गुणवत्तेची, ओलावा-टिपून घेणारी अंतर्वस्त्रे निवडा. ओलावा टिपून घेणारे कपडे त्वचेपासून ओलावा दूर ठेवतात. त्यामुळे त्वचेचा दाह होत नाही आणि अस्वस्थतेचा धोका कमी होतो.
पीरियड पेन रिलीफ रोल-ऑन: मासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या वेदनांमुळे ट्रेकिंगचा आनंद तसाच राहण्यासाठी तुमच्या किटमध्ये अमृतांजन कॉम्फी पीरियड पेन रिलीफ रोल-ऑन ठेवा. आटोपशीर आकारामुळे सुलभतेने हे तुमच्या बॅकपॅकमध्ये ठेवणे सोपे होते आणि गरज पडल्यास काही मिनिटांत यामुळे आराम मिळतो. त्यामुळे तुम्ही सहजतेने पुढे जाऊ शकता.
डिस्पोजेबल लघवी उपकरण: जेव्हा स्वच्छतागृहात तातडीने जाण्याची गरज निर्माण होते आणि दृष्टीक्षेपात कोणतीही स्वच्छतागृहे नसतात तेव्हा डिस्पोजेबल युरीनेशन उपकरण अक्षरक्ष: वरदान ठरू शकते. याच्या मदतीने तुम्हाला उभे राहून मूत्रविसर्जन करता येऊ शकते, एक्सपोजर कमी होते आणि तुमचा खाजगीपणा जपला जातो.
स्त्रियांसाठीची स्वच्छता उत्पादने : गरजेनुसार स्त्रियांसाठीच्या स्वच्छता उत्पादनांचा पुरेसा साठा जवळ ठेवा. तुम्ही सॅनिटरी पॅड, टॅम्पून्स किंवा मासिक पाळीच्या वेळी वापरला जाणारा कप या आवश्यक गोष्टी ट्रेक संपेपर्यंत तुमच्याकडे पुरेशा आहेत ना याची खात्री करा.
बायोडिग्रेडेबल साबण: धुण्यासाठी बायोडिग्रेडेबल साबण निवडून पर्यावरणाचा विचार लक्षात ठेवा. पर्यावरण पूरक पर्याय शोधा जेणेकरून तुम्ही भटकंती करत असलेल्या नाजूक परिसंस्थेला हानी पोहोचणार नाही.
इलेक्ट्रोलाइट ड्रिंक्स: कोणत्याही ट्रेक दरम्यान हायड्रेशन सांभाळणे हे महत्त्वाचे असते, परंतु स्त्रियांसाठी घामाने गमावलेल्या इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करणे विशेष महत्वाचे आहे. वाहून नेण्यास सोपे असलेले इलेक्ट्रोलाइट ड्रिंक्स पॅक करा. त्यामुळे आव्हानात्मक ट्रेल्स पार करण्यासाठी हायड्रेशन आणि ऊर्जा मिळेल.


– सूर्यकिरणांपासून संरक्षण: सनस्क्रीन लावून सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करा, रुंद टोपी आणि शरीराच्या उघड्या भागांना झाकणारे हलके, श्वास घेण्यायोग्य कपडे घाला.
– ड्राय शैम्पू: केस धुण्यादरम्यान चांगले राहण्यासाठी ड्राय शॅम्पू पॅक करून पाणी आणि वेळ वाचवा. फक्त या शांपूची फवारणी करा, तुमच्या डोक्यावर त्याचा मसाज करा आणि लगेच ब्रश करा.
– अतिरिक्त जोड : जंगलातील, निसर्गातील हवा खूपच लहरी असू शकते. म्हणून उबदार आणि कोरडे राहण्यासाठी अतिरिक्त कपडे घेऊन ठेवणे आवश्यक असते. हलके, ओलावा शोषून घेणाऱ्या कपड्यांचा विचार करा. ते तापमान कमी झाल्यावर जादा उब मिळविण्यासाठी तुम्ही सहजपणे वापरू शकता.
– कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आणि वास येऊ नये म्हणून झिप-लॉक बॅग्ज सोबत ठेवा. लक्षात ठेवा, जबाबदारीने वागा. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा.