मी गेलो नाही म्हणून चौकशीचा ससेमिरा

मी त्यांच्याकडे गेलो नाही. त्यामुळे माझ्यामागे विविध एजन्सीजकडून चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. मी तिकडे गेलो असतो तर माझ्यावर ईडीची कारवाई झाली नसती. परंतु मी शरद पवारांच्या विचारांसोबत राहिलो. विधानसभेआधी ते माझा केजरीवाल करतील, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला.

काटेवाडी येथे झालेल्या सभेत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांवर जोरदार तोफ डागली. विरोधकांची मलिदा गॅंग येथे लोकांना धमकावत आहे, असा आरोप करून ते म्हणाले, सुप्रिया सुळे यांना अधिकचे मतदान झाले तर तुमच्याकडे बघून घेऊ, अशी धमकी दिली जात आहे. परंतु त्यांच्या धमक्यांना भीक घालू नका. लोकसभा झाल्यावर सहा महिन्यांतच त्यांना तुमच्याकडे विधानसभेला मत मागायला यायचे आहे. त्यामुळे ते काही करू शकणार नाहीत. कुटुंब पह्डणारांचा बदला घ्या असे आवाहन करत ते म्हणाले, येथे यापूर्वी मंगलदास बांदल यांनी भाषण केले. अजित पवार ते ऐकून घेत होते. बांदल यांच्या भाषणाची क्वालिटी बघा. उपस्थितांनी त्यांना खरेच मारायला हवे होते.