
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर आज दोन रुपयांनी महागला. केंद्र सरकारने एलपीजी वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यासाठी ही दरवाढ सर्वसामान्य ग्राहकांच्या माथी मारली आहे. या दरवाढीनंतर 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत मुंबईत 505.05 रुपये झाली आहे.
गेल्या जूनपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत दर महिन्याला वाढ होत आहे. जीएसटी आणि एकूण किमतीत 16.21 रुपयांची वाढ ही यामागची कारणे असल्याचे सांगितले जाते. गेल्या महिनाभरात दुसऱयांदा ही दरवाढ झाली आहे. वितरकांचे कमिशन 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 48.98 रुपये आणि 5 किलोच्या सिलिंडरसाठी 24.20 रुपये होते. ते आता अनुक्रमे 50.58 आणि 25.29 रुपये करण्यात आले आहे.




























































