निवृत्तीवेतनधारकांना 2 टक्के, वाढीव महागाई भत्ता मंजूर करा; बृहन्मुंबई पेन्शनर्स असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवृत्तीवेतनधारकांना 2 टक्के वाढीव महागाई भत्ता मंजूर करण्यात यावा, अशी मागणी बृहन्मुंबई पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाढत्या महागाईमुळे निवृत्तीवेतनातून दैनंदिन खर्च भागवणे अत्यंत कठीण झाले आहे, त्यामुळे शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीधारकांना वाढीव महागाई भत्ता तातडीने रोखीने मंजूर करण्यात यावा, अशी विनंती असोसिएशनने केली आहे.

राज्य शासनाने 19 मेच्या शासन निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई वाढीच्या थकबाकीची रक्कम मंजूर केली आहे. शासनाने 11 मे 2026 रोजी आयएएस अधिकाऱयांसाठी 1 जानेवारीपासून 2 टक्के महागाई भत्ता वाढवला आहे. त्याच धर्तीवर राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचाही विचार करून त्यांना देय असलेला 2 टक्के वाढीव महागाई भत्ता त्वरित रोखीने मंजूर करावा, अशी विनंती असोसिएशनचे अध्यक्ष श्रीराम गवळी, कार्यवाह रघुनाथ मोहिते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.