
राज्यात दहा नवीन शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार असून आठ विद्यमान जीएनएम महाविद्यालयांचे बीएससी नर्सिंग महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. तसेच पाच विद्यमान शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालयांची प्रवेशक्षमता 50 वरून 100 करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. मुंबईतील जे. जे. रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय, धुळे, सोलापूर, बीड, अकोला, नागपूर, सांगली येथील एकूण आठ जीएनएम महाविद्यालयांचे रूपांतर करून प्रत्येकी 100 प्रवेशक्षमतेची शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत.


























































